दुसरी शिकलेल्या मीरा यांचे "यू-ट्यूब'वर चॅनेल

दिलीप कुऱ्हाडे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा स्वच्छ करायचा, अशी विविध विषयांची प्रात्यक्षिके दुसरी शिक्षण असलेल्या मीरा विश्‍वासराव "यू-ट्यूब' चॅनेलवर देत आहेत. जगभरातील सात लाख 81 हजार लोकांनी विशेषतः महिलांनी हे चॅनेल पाहिले (सबस्क्राईब) आहे. त्यामुळे त्यांना " यू-ट्यूब'ने 210 डॉलर दिले आहेत. ही रक्‍कम दिवसेंदिवस वाढत आहे. 

येरवडा - तांब्या व पितळी भांडी धुण्याचे तंत्र, भरल्या वांग्याची भाजी कशी करायची, वीज व फ्रीज न वापरता पाणी थंड कसे करावे, यांपासून ते कंगवा कसा स्वच्छ करायचा, अशी विविध विषयांची प्रात्यक्षिके दुसरी शिक्षण असलेल्या मीरा विश्‍वासराव "यू-ट्यूब' चॅनेलवर देत आहेत. जगभरातील सात लाख 81 हजार लोकांनी विशेषतः महिलांनी हे चॅनेल पाहिले (सबस्क्राईब) आहे. त्यामुळे त्यांना " यू-ट्यूब'ने 210 डॉलर दिले आहेत. ही रक्‍कम दिवसेंदिवस वाढत आहे. 

सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरी येथील मीरा विश्‍वासराव यांनी "मीरा विश्‍वासराव' या नावाने "यू-ट्यूब' चॅनल सुरू केले आहे. पती शंकर यांच्या मदतीने त्यांनी ही किमया साधली आहे. त्यांनी घरगुती विषयांवरील प्रात्यक्षिकांच्या फिल्म तयार केल्या. त्यानंतर त्या यू-ट्यूबवर अपलोड केल्या. सुरवातीला त्यांना अल्पसा प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यांनी निराश न होता या विषयांवर फिल्म तयार करण्याचे काम सुरूच ठेवले. त्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. जगभरातील 7 लाख 81 हजार जण त्यांच्या चॅनेलला फॉलो करीत आहेत. त्यामुळे "यू-ट्यूब'ने त्यांना 210 डॉलर (14 हजार 700 रुपये) त्यांच्या बॅंक खात्यात जमा केल्याचे कळवले आहे. 

सध्या श्रावण सुरू झाल्यामुळे दररोज त्यांच्या यू-ट्यूब चॅनल पाहणाऱ्यांची संख्या पंधरा ते वीस हजारांच्या घरात गेली आहे. मीरा यांच्या पतीचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे कुमठेकर रस्त्यावर दुचाकी व मोटारींचे नंबर प्लेट तयार करण्याचे दुकान आहे. त्यांनी व्हिडिओ शूटिंग व एडिटिंगचे खासगी संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे. मीरा यांचे खाद्य पदार्थ व गृहोपयोगी वस्तूंची निगा व काळजी घेण्याचे शोधलेले वैज्ञानिक उपाय व पती शंकर यांचे फिल्म बनविण्याचे तंत्र याचा संगम साधत त्यांनी हे काम केले आहे.

Web Title: 2nd class learned Meeras channel on You Tube