Pune : गॅसच्या भडक्यामुळे भाजलेल्या दुसऱ्या मुलीचाही मृत्यू, बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरची विक्री बेतली जीवावर

गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Pune
Punesakal

Pune - सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे भडका उडून भाजलेल्या दुसऱ्या मुलीचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. प्रमीला मन्नाराम चौधरी (वय अंदाजे 10 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून गंभीर जखमी असलेल्या मन्नाराम चौधरी यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दि. 4 जून रोजी गीता मन्नाराम चौधरी हिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.

Pune
Pune - Bengaluru विमान १० तास झाले आलेच नाही, प्रवाशांचा गोंधळ, नाईलाजाने पोलीसांना उचलून न्याव लागलं

किरकटवाडी येथे किराणा मालाचे दुकान चालवत असलेले मन्नाराम चौधरी हे बेकायदेशीरपणे मोठ्या गॅस सिलिंडर मधून लहान सिलिंडर मध्ये गॅस भरुन त्यांची विक्री करत असत. यासाठी चौधरी यांनी एक शेड भाड्याने घेतले होते. दि.1 जून रोजी सकाळच्या सुमारास मन्नाराम चौधरी आणि गीता व प्रमीला या दोन मुली मोठ्या सिलिंडर मधून लहान सिलिंडर मध्ये गॅस भरत असताना भडका उडाला व त्यात तिघेही भाजले गेले.

Pune
Mumbai Fraud : नफ्याचे आमिष दाखवत पतपेढी संचालकांनी 47 जणांना 17 लाख 36 हजाराला घातला गंडा

गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील अगोदर गीता व आज प्रमीलाचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वीही झाली होती दुर्घटना..मन्नाराम चौधरी अनेक दिवसांपासून बेकायदा गॅस विक्री करत असून अगोदर ते किराणा दुकानातच मोठ्या सिलिंडर मधून लहान सिलिंडर मध्ये गॅस भरत असत अशी माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी अशीच गॅस गळती होऊन मन्नाराम चौधरी यांचा हात भाजला होता. त्यानंतरही त्यांनी दुसरीकडे शेड भाड्याने घेऊन हा धंदा सुरू ठेवला.

Pune
Mumbai Fraud : नफ्याचे आमिष दाखवत पतपेढी संचालकांनी 47 जणांना 17 लाख 36 हजाराला घातला गंडा

गॅस एजन्सी धारकांची पळापळ.किरकटवाडी परिसरात चार ते पाच गॅस एजन्सींच्या माध्यमातून सिलिंडरचा पुरवठा केला जातो. पहिल्या मुलीचा मृत्यू झाल्यापासून संबंधित एजन्सीधारक आपलाच वितरक या दुकारनदाला सिलिंडर पुरवत नव्हता ना ? याची खात्री करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. नेमके कोणत्या एजन्सीचे वितरण कर्मचारी चोरुन या दुकानदाराला गॅस सिलिंडर पुरवत होते ते आता पोलीस तपासातूनच स्पष्ट होण्याची शक्यता आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com