ऊरूळी कांचन येथून तीन मुले बेपत्ता

bepatta
bepatta

उरुळी कांचन (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे महानुभाव पंथाच्या सत्संगासाठी जाधववाडी (ता. जुन्नर) येथुन आलेली तीन अल्पवयीन मुले आठ दिवसापासुन बेपत्ता झाली आहेत. केशव राजेंद्र पटेल (वय- १४ रा. बामखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार), शुभम बाळासाहेब बोरगे (वय- १५ रा. खेपडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) व गोपीचंद नरेंद्रमुनी अंकुलेनकर (वय- १४ रा. तुडका, ता. तुमसर जि. भंडारा, सध्या तिघेही रा. जाधववाडी, ता. जुन्नर) ही  बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. 

दरम्यान बेपत्ता झालेल्या तीनही अल्पवयीन मुलांचा मुळगावी व नातेवाईकांच्या शोध घेतला असता, सापडुन न आल्याने टिळेकरवाडी येथील महानुभाव पंथाच्या सत्संगाचे संयोजक राजेंद्र दत्तात्रय खेडेकर (वय - ४१ रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली ) यांनी याप्रकरणी वरील तीनही मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्क्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन, वरील तीनही मुलांचा शोध सुरु केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.       

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, राजेंद्र खेडेकर यांनी हरिभाऊ तात्याबा कांचन, इंद्रभान सोनबा लोनकर, संजय बाजीराव भोसले, व शामराव बबनराव सावंत यांच्या मदतीने टिळेकरवाडी येथे 22 मार्च पासुन एक महिण्याचे महानुभाव पंथाच्या सत्संगाचे आयोजन केले होते. या सत्संगात राज्यभरातुन महानुभव पंथाचे दिड हजाराहुन अधिक साधुसंत व जाधववाडी (ता. हवेली) य़ेथील श्री देवदत्त आश्रमातील एकावन्न अल्पवयीन मुले सहभागी झाली होती. या एक्कावन्न मुलांच्यापैकी केशव पटेल, शुभम बोरगे, गोपीचंद अंकूळनेरकर ही तीन मुले मागिल गुरुवारी (ता. 11) मुले गायब झाल्याची बाब संयोजकांच्या लक्षात आली.

यावर राजेंद्र खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागिल आठ दिवसात वरील तीनही मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधुन मुलांच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी केली. मात्र तीनही मुले आढळुन न आल्याने राजेंद्र खेडेकर यांनी मंगळवारी (ता. 16) रात्री उशीरा लोणी काळभोर पोलिसात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनीही वेळ न दवडता वरील तीन मुलांच्या अपहरानाची तक्रार दाखल करुन चौकशीस सुरुवात केली. 

दरम्यान केशव पटेल याची ऊंची ४.२ फुट असुन, अंगाने सडपातळ आहे. त्यांच्या अंगात फूल भायाचा शर्ट व त्याने राखाडी पॅंट घातली आहे. तर शुभम बोरगे याची ऊंची ४.३ फुट असुन त्याने अंगाने सडपातळ व फूल भायाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅंट घातली आहे. तिसरा मुलगा गोपीचंद अंकुलेनकर याची ऊंची ४.१ फुट असुन, तो अंगाने सडपातळ आहे. त्याने अंगात फूल भायाचा पांढरा शर्ट व फिक्कट निळसर रंगाची पॅंट घातलेली आहे. वरील वर्णनाची वर्णनाची मुले कोणाला आढळून आल्यास, संबधितांनी  लोणी काळभोर पोलिसांशी (०२० -२६९१३२६० अथवा 9594788484 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असा आवाहन पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com