भुसुरुंगाच्या स्फोटात तीन लहान मुले जखमी

जनार्दन दांडगे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

उरुळी कांचन (पुणे) : भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे (ता. हवेली) येथील नियोजित डेपोच्या जागेतील डोंगर सपाटीकरणाचे काम चालु असताना, कंत्राटदाराने घडविलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात डेपोलगतच्या वस्तीवरील तीन लहान मुले जखमी झाली. तर तीसहुन अधिक घराच्या भिंतीना तडे गेले आहेत. या स्फोटामुळे उडालेले दगड जनावरांना लागल्याने वस्तीवरील जनावरेही जखमी झाली आहेत. भुसरुंगाचा स्फोट दुपारी दोन वाजनेच्या सुमारास झाला असुन, कंपनीने भुसरुंगाने डोंगर सपाटीकरणाचे चालु असलेले काम त्वरीत थांबवावे अशी मागणी तरडेच्या उपसरपंच भामाबाई सुदाम काळे व नागरीकांनी केली आहे. 

तरडे गावच्या हद्दीतील खालच्या तरडेगाव परीसरातील सुमारे सत्तर एकर जागेत मागिल वर्षभरापासुन भारत पेट्रोलियम कंपनीच्या नियोजित डेपोचे काम चालु आहे. नियोजित डेपोच्या जागेत डोंगर असल्याने, सदर डोंगरांचे सपाटीकरण करण्यासाठी कत्रांटदाराने शनिवारी (ता. 18) दुपारी दोन वाजनेच्या सुमारास भुसुगांचा स्फोट घडवुन आनला. या स्फोटातुन उडालेले दगड व गोटे, डेपोलगतच्या वस्तीत जाऊन पडले. यात घरासमोर खेळणारी दोन लहान मुले व एक मुलगी जखमी झाली. तर तीसहुन अघिक घरांच्या भितींना तडे गेले. तर कांही घरांच्या छपाचे पत्रे फुटले. तर दुसरीकडे घराबाहेर भांधलेल्या जनावरांनाही स्फोटातुन उडाले्ल्या दगडगोट्यांचा प्रसाद मिळाला. 

याबाबत अधिक माहिती देताना तरडे गावच्या उपसरपंच भामाबाई सुदाम काळे म्हणाल्या, भुसुरुंगाच्या स्फोट करण्यापुर्वी कंपनीने अथवा डोंगर सपाटीकरणाचे काम करणाऱ्या कत्रांटदाराने आसपास रहाणाऱ्या नागरीकांना स्फोटापासुन होणाऱ्या संभाव्य धोक्याची कल्पना देण्याची आवश्यकता होती. तसेच स्फोट करण्यापुर्वी नागरीकांना संबधित जागेपासुन दुर जाण्याबाबत सांगणे गरजेचे होते. मात्र स्फोट झाल्यानंतर नंतर नागरीकांना समजले आहे. यात तीसहुन अघिक घरांचे नुकसान झाले आहे. तर तीन मुलेही जखमी झाली आहेत. कंपनीने तात्काळ काम करावे व ज्या ज्या घरांचे नुकसान झाले त्या त्या घरमालकांना नुकसान भरपाई द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच डेपोलगत वस्ती असल्याने यापुढील काळात डोंगर सपाटीकरण कऱण्यासाठी भुसरुंग करु नये अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

दरम्यान कंपनीच्या वतीने बोलतांना भारत पेट्रोलियम कंपनी सहाय्यक प्रंबधक प्रबल सिंग म्हणाले, भुसरुंगामुळे नुकसान झाल्याचे लक्षात येताच, भुसरुंग उडविण्याचे काम तात्काळ थांबबविण्यात आले आहे. यापुढील काळात सपाटीकरणाचे काम करताना डेपोलगच्या वस्तीमधील नागरीकांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या घरांचे व जखमीची पहाणी करुन, पहानीचा अहवाल कंपणीकडे पाठविला जाणार आहे. कंपनीच्या नियमाप्रमाने मदत करण्यात येईल. 

Web Title: 3 children injured in landmines