तीन कोटींच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे - बाद झालेल्या चलनातील तीन कोटी रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी शहरात आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी शुक्रवारी पहाटे रविवार पेठेतून ताब्यात घेतले. संगमनेर नगरपालिकेचे नगरसेवक गजेंद्र बजाबा अभंग (वय ४७) यांचा त्यात समावेश आहे. 

नगरसेवक अभंग यांच्यासह विजय अभिमन्यू शिंदे (वय ३८, रा. खडकी), आदित्य विश्‍वास चव्हाण (वय २५, भूगाव रोड, मुळशी), सुरेश पांडुरंग जगताप (वय ४०, रा. खराडेवाडी, ता. फलटण) आणि नवनाथ काशिनाथ भंडागळे (वय २८, रा. विकास चौक, कर्वेनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभंग यांच्यासह पाच जण रोकड बदलण्यासाठी रविवार पेठेत येणार आहेत, अशी माहिती कर्मचारी सागर केकाण यांना समजली. त्यानुसार सहायक निरीक्षक वैभव पवार, कर्मचारी गणेश माळी, समीर माळवदकर, महेश बारवकर, इम्रान नदाफ, अनिकेत बाबर आदींनी त्यांना पकडले.

Web Title: 3 crore rupees old currency seized crime