download-(2).jpg
download-(2).jpg

महिलेची 3 लाखाची फसवणुक करुन मांत्रिकाने केला बलात्कार

पुणे : आजारी पतीची तब्येत ठिक व्हावी, यासाठी मांत्रिकाचा आधार घेणाऱ्या महिलेवर मांत्रिकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबरोबरच मांत्रिकाने महिलेची 3 लाख रूपयांची फसवणुकही केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकास अटक केली आहे. 

शब्बीर युनुस शेख (वय 45) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिला या खासगी क्लास घेतात. महिलेचे पती काही दिवसांपासून आजारी होते.

दरम्यान, महिलेची पुणे स्टेशन येथे शब्बीर नामक मांत्रिकाशी ओळख झाली. महिलेने त्यास पतीच्या आजाराबाबत माहिती दिली. त्यावेळी त्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी काही मंत्रउपचार करण्यास सांगितले. त्यासाठी महिलेकडुन 3 लाख रूपयांची रक्कमही घेतली. दरम्यान मांत्रिकाने महिलेशी जवळीक वाढवुन तिच्यावर बलात्कार केला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com