पुणे: वारजे माळवाडीत सराईत गुन्हेगाराकडून 3 गावठी पिस्तुल जप्त

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 30 जुलै 2018

राऊत हा शहर पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यास यापुर्वी घरफोडी, हत्यार बाळगणे, जबरी चोरी, वाहन चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने ३० जुलै रोजीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

पुणे : वारजे माळवाडी येथे मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावुन वारजे माळवाडी पोलिसांनी तीन गावठी पिस्तुल व 10 काडतुसे विना परवाना बाळगल्या व विक्री प्रकरणी निळकंठ सुर्यकांत राऊत (वय३८ वर्षे रा. भैरवनाथ हाऊसिंग सोसायटी रूपी नगर निगडी पुणे) यास अटक केली आहे. 

पोलिस नाईक आशिष बोटके यांना बातमी मिळाली की, महामार्गालगत हॉटेल आम्रपाली जवळ गावठी पिस्तुल विक्रीसाठी घेवून येणार आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, तपास पथकातील अधिकारी सिताराम धावडे यांना सांगितले त्याप्रमाणे हॉटेल आम्रपाली समोर सापळा लावला. नीलकंठ राऊत यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक लाख सहा हजार१०० किंमतीचे तीन देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व १० जिवंत काडतूसे असे मिळाले. पथकातील सहायक फौजदार जगन्नाथ गोरे, पोलिस नाईक मॅगी जाधव, अमोल काटकर, अरूण किटे, विजय कांबळे, नितीन जगदाळे, तेजस पवार संदिप शेळके, सचिन धोत्रे यांनी त्यास सापळा लाऊन पकडले.

राऊत हा शहर पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यास यापुर्वी घरफोडी, हत्यार बाळगणे, जबरी चोरी, वाहन चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने ३० जुलै रोजीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

Web Title: 3 pistols seized in Pune