महापालिकेच्या मतदानासाठी 3 हजार 432 केंद्रांची व्यवस्था 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीकरिता नियोजित केलेल्या मतदान केंद्रनिहाय मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, या निवडणुकीसाठी विविध प्रभागांमध्ये सुमारे 3 हजार 432 केंद्रे राहणार आहेत. महापालिका आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध केली आहे. 

शहरातील 41 प्रभागांकरिता येत्या 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या प्रभागांमध्ये सुमारे 26 लाख 31 हजार मतदार असून, त्यासाठी सुमारे 3 हजार 432 मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. प्रत्येक आठशे मतदारांकरिता एका केंद्राची व्यवस्था केली आहे. बाणेर- बालेवाडी- पाषाण (प्रभाग क्र. 9) मध्ये सर्वाधिक म्हणजे 120 मतदान केंद्रे आहेत. याआधी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय यादी जाहीर केली आहे, त्यानुसार महापालिकेच्या संकेतस्थळावर बुधवारी रात्री केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. 

""निवडणुकीसाठी नियोजित केलेल्या मतदान केंद्रांनुसार नवी मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे मतदारांना नावे शोधणे सुलभ होईल,'' असे महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अकोलकर यांचा राजीनामा 
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने तिकिटांचे वाटप करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कामगार सेलचे उपाध्यक्ष ऍड. म. वि. अकोलकर यांनी बुधवारी पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला. यापुढील काळात कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्य करीत राहणार असल्याचेही अकोलकर यांनी पत्रकात म्हटले आहे. 

Web Title: 3 thousand 432 polling centers