esakal | कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा
sakal

बोलून बातमी शोधा

corona and ganeshotsav

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर, (पुणे): गणेशोत्सव हा आपला सर्वांचा आनंदाचा, श्रद्धेचा, भक्तीचा सण असून, गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही काळजी घेऊन, गर्दी न करता कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून योग्य ती खबरदारी घेऊन या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा असे आवाहन हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी केले आहे.

हेही वाचा: पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना पुणेकरांची पसंती

लोणी काळभोर पोलीस ठाणे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ चे आयोजित बैठकीचे आयोजन कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथिल मंगल कार्यालयात करण्यात आली होती. यावेळी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक लोक प्रतिनिधी व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कल्याणराव विधाते बोलत होते.

यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे सुभाष काळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तमराव चक्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, दादाराजे पवार, श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, अमृता काटे, जयंत हंचाटे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, पंचायत समिती सदस्य सनी उर्फ युगंधर काळभोर, हेमलता बडेकर, अनिल टिळेकर, तंटामुक्ती माजी जिल्हाध्यक्ष रघुनाथ चौधरी, लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर, उरुळी कांचनचे सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनीषा कड, आळंदी महातोबाच्या सरपंच सोनाली जवळकर, रंगनाथ काळओर, कदमवाक वस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, सोरतापवाडीचे उपसरपंच निलेश खटाटे, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, विविध गावचे पोलीस पाटील व सार्वजनिक मंडळाचे सदस्य क कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे विमानतळावर प्रवाशांच्या सोबतीला आता मदतनीसही !

यापुढे बोलताना विधाते म्हाणाले, नवीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवासाठी परवानगी दिली जाणार नाही. तसेच जुन्या मंडळांनी परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा प्रतिस्थापणा व विसर्जन मिरवणुका काढू नयेत, बाप्पाची घरगुती मूर्ती दोन फूट व मंडळांची मूर्ती चार फुटच असावी, आरती, पूजा, कार्यक्रम करताना गर्दी करू नये, शक्यतो मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी.

यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले," आपल्या सणांचे महत्त्व प्रशासन समजू शकते या सणांवर बंधन घालायला प्रशासनाला आनंद नक्कीच होत नाही, मात्र कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला सर्वांना हतबल केले आहे. त्यामुळे गणेश मूर्तींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत व रात्री सुरक्षेसाठी मंडपात कार्यकर्ते ठेवावेत, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गरजूंना मदत यासारखे उपक्रम राबवावेत, आपले मंडळ किंवा घर गणेशोत्सवातील गर्दी मुळे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मोकाशी यांनी यावेळी केले.

loading image
go to top