पोलिसाकडून रस्त्यात पडली ३० काडतुसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे - भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या ताब्यात असलेली ३० काडतुसे निष्काळजीपणामुळे धनकवडीतील शाहू बॅंक चौकात पडण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. दरम्यान, १२ काडतुसे घेऊन पळणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. काडतुसे नेमकी पडली कशी?, याबाबत संबंधित पोलिसाचा जबाब नोंदविला जाणार आहे.

राहुल शिंदे (वय २५, रा. सिंहगड रस्ता) व मिलिंद शिर्के (वय २५, रा. नऱ्हे) अशी अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.  कर्मचारी लांबदरे यांच्याकडून रस्त्यावर काडतुसे पडली. ३५ काडतुसांचे पाकीट लांबदरे यांच्याकडे होते. गस्तीवर असताना पाकिटामधील ३० काडतुसे शाहू बॅंक चौकात सोमवारी पडली. ही घटना पाहणाऱ्या चंदन बालाजी नायडू (रा. बालाजीनगर) यांनी सहकारनगर पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, गुन्हे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या वेळी नायडू यांनी १३ काडतुसे त्यांच्या ताब्यात दिली. त्याचबरोबर काडतुसे घेऊन पळणाऱ्या दुचाकीवरील दोघांचे वर्णन व दुचाकी क्रमांक दिला. त्यावरून पोलिसांनी शोध घेऊन शिंदे व शिर्के यांना पकडले. त्यांच्याकडून १२ काडतुसे जप्त केली. घटनास्थळावरून पोलिसांना आणखी पाच काडतुसे मिळाली, तर लांबदरे यांच्या रायफलमध्ये पाच काडतुसे आहेत. 

Web Title: 30 cartridges fell on the road from police