तीस आरोग्य केंद्रे आरोग्यवर्धिनी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना अधिकाधिक आरोग्य सेवा पोचविण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारली जात आहेत. पुणे जिल्ह्यात आयुषमान भारत योजनेतून ३० प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘आरोग्यवर्धिनी केंद्रे’ केली जाणार आहेत. त्याचे कामही सध्या सुरू झाले आहे. या आरोग्य केंद्रांतून आरोग्याशी संबंधित १३ सेवा मोफत पुरविल्या जाणार आहेत.

भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना अधिकाधिक आरोग्य सेवा पोचविण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारली जात आहेत. पुणे जिल्ह्यात आयुषमान भारत योजनेतून ३० प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘आरोग्यवर्धिनी केंद्रे’ केली जाणार आहेत. त्याचे कामही सध्या सुरू झाले आहे. या आरोग्य केंद्रांतून आरोग्याशी संबंधित १३ सेवा मोफत पुरविल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी ही माहिती दिली. सरकारी दवाखान्यांमध्ये आरोग्य सुविधा बळकट करण्याचा, तसेच केंद्रात रुग्णांना प्रतिबंधात्मक व उपचाराची सेवा देण्याबरोबरच प्रयोगशाळेतील तपासण्या व औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत.

या दवाखान्यांमध्ये विशेषतः योगाशी संबंधित सल्ला, मार्गदर्शनही नव्याने मिळणार आहे, याचा समावेश या नव्या योजनेत करण्यात आला आहे.

जिल्ह्यातून निवडलेल्या ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे सुरू आहेत. काही आरोग्य केंद्रांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. लवकरच ही केंद्रे आयुषमान योजनेतील निकषांनुसार परिपूर्ण केली जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून आरोग्याच्या ज्या आज मूलभूत सेवा आहेत, त्या सेवा रुग्णांपर्यंत अधिक परिणामकारकतेने पोचण्यास मदत होणार आहे.
- प्रवीण माने, सभापती, आरोग्य व बांधकाम जिल्हा परिषद, पुणे

निवडलेले तालुकानिहाय ३० दवाखाने
बारामती - डोर्लेवाडी, मोरगाव, होळ, पणदरे, सांगवी. इंदापूर - बावडा, बिजवडी, कळस, लासुर्णे, निरवांगी, पळसदेव, सणसर. आंबेगाव - पेठ, धामणी, अडिवरे, डिंभे, म्हाळुंगे पडवळ, निरगुडसर, तळेघर. शिरूर - कर्डे, कवठे-येमाई, केंदूर, मांडवगण फराटा, निमोणे, रांजणगाव, टाकळी हाजी, तळेगाव ढमढेरे. पुरंदर - परिंचे. भोर - नेरे. खेड - करंजविहिरे

या सेवा मोफत
    प्रसूतिपूर्व व प्रसूतीच्या सेवा 
    नवजात अर्भक व नवजात१ बालकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा  
    कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व आवश्‍यक आरोग्य सेवा.
    संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रोगांची बाह्य रुग्णसेवा.
    संसर्गजन्य रोगांची तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना 
    मानसिक आरोग्य तपासणी व उपचार
    नाक, कान, घसा व डोळे या आजारासंबंधीच्या सेवा
    दात व मौखिक आरोग्याच्या सेवा
    वाढत्या वयातील आजारावरील उपचार.
    प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा. 
    योग सूत्र

Web Title: 30 Health Center