Pune : महापालिकेकडे ३० टन जुन्या वस्तू जमा; थ्री आर केंद्रांची स्थापना

अवघ्या ११ दिवसात १ हजार २०० नागरिकांनी सहभाग घेत ३० टन जुन्या वस्तू जमा झाल्या
Pune : महापालिकेकडे ३० टन जुन्या वस्तू जमा; थ्री आर केंद्रांची स्थापना

पुणे : घरात नको असलेल्या वस्तू, जुने कपडे नागरिकांनी बाहेर कुठेही फेकून दिल्याने अस्वच्छता निर्माण होत आहे. हे प्रकार थांबावेत यासाठी महापालिकेने थ्री आर केंद्रांची स्थापना केली आहे. या उपक्रमात अवघ्या ११ दिवसात १ हजार २०० नागरिकांनी सहभाग घेत ३० टन जुन्या वस्तू जमा झाल्या आहेत.

जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी ‘रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल’ सेंटर्स म्हणजेच 'थ्री आर' केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुर्नवापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्त करणे हा ‘थ्री आर’ केंद्रे उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.

Pune : महापालिकेकडे ३० टन जुन्या वस्तू जमा; थ्री आर केंद्रांची स्थापना
Pune Crime : चोरीचे 14 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत, सात गुन्ह्यांमधील पावणेदोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात

पुणे शहरातील नागरिकांना ही सुविधा मिळावी यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. कल्याणी नगर येथील डॉ. हेडगेवार क्रीडांगण, जुने औंध क्षेत्रिय कार्यालय, ब्रेमन चौक आणि शरदचंद्र पवार उद्योग भवन या ठिकाणचे 'थ्री आर' केंद्र रोज सकाळी सात ते दुपारी १ या वेळेत नागरिकांसाठी खुली आहेत.

Pune : महापालिकेकडे ३० टन जुन्या वस्तू जमा; थ्री आर केंद्रांची स्थापना
Pune Accident : बोअरवेल ट्रक खाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू

घनकचरा विभागाच्या उपलब्ध आशा राऊत म्हणाल्या वीस मे पासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून ११ दिवसात १ हजार २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत एकूण ३० टन जुन्या वस्तू महापालिकेकडे जमा केल्या आहेत. त्यामध्ये ५६ टक्के कपडे, ८ टक्के ई-वेस्ट, ९ टक्के पुस्तके आणि २७ टक्के खेळणी,

पादत्राणे, भांडी, शोभेच्या वस्तू, बॅग्स यांसारख्या इतर वस्तू गोळा केल्या आहेत. एकूण १ हजार ७४९ पुस्तके आणि ४ हजार ६०८ पादत्राणांचे जोड संकलित करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी पुनःवापर व पुनःचक्रीकरणासाठी दिल्या आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com