पुणे- कोथरुडमध्ये महिलेचा वार करून खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

शुभांगी खटावकर या घरकाम करायच्या. नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या स्वत:च्या दुचाकीवरून कामाला जाण्यासाठी निघाल्या. कर्वेनगरहून निघून त्या राहुलनगर येथे पोहोचल्या असता अज्ञात हल्लेखोराने त्यांना अडवले व त्यांच्यावर हल्ला केला.

पुणे - मंगळवारी पहाटेच्या सुमारास कामासाठी निघालेल्या महिलेचा अज्ञात हल्लेखोराने खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोथरूड येथे घडली आहे. शुभांगी खटावकर (वय 31) असे मृत महिलेचे नाव असून, हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शुभांगी खटावकर या घरकाम करायच्या. नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या स्वत:च्या दुचाकीवरून कामाला जाण्यासाठी निघाल्या. कर्वेनगरहून निघून त्या राहुलनगर येथे पोहोचल्या असता अज्ञात हल्लेखोराने त्यांना अडवले व त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोराने डोक्यावर घाव घातल्याने शुभांगी यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभांगी यांना पाहून भेदरलेल्या हल्लेखोराने त्यांचीच दुचाकी घेऊन तिथून पळ काढला.

पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांना शुभांगी यांचे पती त्यांच्या मृतदेहाजवळ रडताना आढळले. अलंकार पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Web Title: 31yr old woman was murdered by unidentified person in Kothrud Pune

टॅग्स