पुणे : पर्वतीत तीनपर्यंत 33 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पर्वती विधानसभा मतदारसंघात तीन वाजेपर्यंत केवळ 33 टक्के मतदान झाले. त्यातील सकाळी 9 ते 1 या टप्प्यात सर्वाधिक मतदान झाले.

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात तीन वाजेपर्यंत केवळ 33 टक्के मतदान झाले. त्यातील सकाळी 9 ते 1 या टप्प्यात सर्वाधिक मतदान झाले. पर्वतीमध्ये झोपडपट्टीमधील मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र त्या परिसरात कमी प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसते. तर सोसायटी परिसरात चांगले मतदान झाले आहे.  झोपडपट्टी परिसरातील केंद्रांवर  चारनंतर गर्दी वाढू लागली आहे.

Vidhan Sabha 2019 : पुण्यात मतदानाची टक्केवारी कमीच; पण कोथरुडमध्ये...

संघातील 204 मतदान केंद्रातील 10 व्हीव्हीपॅट आत्तापर्यंत बदलले आहेत. या ठिकाणी एक वाजेपर्यंत 24 टक्के मतदान झाले होते. तर सकाळी सात ते नऊ या पहिल्या टप्प्यात 5.6 टक्के मतदान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 33 percent voting completed in Parvati till 3 pm