पीएमपीला मिळणार तेहेतीस ‘तेजस्विनी’

Tejaswini
Tejaswini

पुणे - पीएमपीने खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आणखी ३३ बस सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्य सरकारकडून या बस मिळणार असून, या महिनाअखेरपर्यंत त्या उपलब्ध होतील. यामुळे या बसची संख्या आता ६६ होणार आहे.

राज्य सरकारकडून या बस यापूर्वीच पीएमपीला मिळणार होत्या. मात्र त्यास विलंब झाल्याने पीएमपीने नव्याने आलेल्या मिडी बसपैकी ३३ बस तेजस्विनी सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. महिलांसाठी वेगवेगळ्या मार्गांवर सुरू केलेल्या या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या बस महिलांसाठी ठेवण्यात येणार आहेत. ज्या मार्गावर महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्या मार्गांवर तेजस्विनी बस वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

जानेवारीच्या अखेरपर्यंत या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. तेजस्विनी बसचा प्रतिसाद पाहता येणाऱ्या बसदेखील महिलांसाठी राखीव असतील.
- नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com