कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वढू बुद्रुक येथे शंभूराजांचा ३३२ वा बलिदान स्मरणदिन प्रातिनिधिक स्वरूपात 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वढू बुद्रुक येथे शंभूराजांचा ३३२ वा बलिदान स्मरणदिन प्रातिनिधिक स्वरूपात 

कोरेगाव भीमा, ता. ११ : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर श्रीक्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे छत्रपती संभाजीमहाराजांचा ३३२ वा बलिदान स्मरण दिन मर्यादित उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय पुजा करुन करण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे याव र्षी प्रशासनाच्या आवाहनानुसार वढु बुद्रुक येथील पुण्यतिथीचे दरवर्षीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र सकाळी आठ वाजता आमदार ॲड. अशोक पवार यांच्या उपस्थितीत दौंडचे उपविभागीय पाेलिस अधिकारी अमृत देशमुख यांच्या हस्ते समाधिस्थळी प्रातिनिधीक शासकीय पुजा करण्यात आली. तर आमदार पवार यांच्या हस्ते शंभुराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने शासकीय सलामीही देण्यात आली. दरम्यान पुण्यतिथीनिमित्त समाधि स्थळी फुलांची सजावट करण्यात आली होती.

तहसिलदार लैला शेख व पोलिस निरीक्षक विनोद घुगे तसेच माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, सदस्य माऊली भंडारे, कृष्णा आरगडे उपस्थित होते. यावेळी वढु ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अनिल शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या दोन दिवस कठोर निर्बंध असल्याने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मर्यादित स्वरुपाच्या कार्यक्रमामुळे इच्छा असूनही अनेक शंभुभक्त व ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाहीत. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com