कुटुंब न्यायालयांमधील 34 समुपदेशकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

पुणे - राज्यातील कुटुंब न्यायालयांतील ३४ समुपदेशकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

कुटुंब न्यायालयात दाखल होणाऱ्या वैवाहिक वादात समेट घडविणे, दांपत्याला घटस्फोटापासून परावृत्त करणे, तडजोड घडवून  आणणे यासाठी राज्यातील विविध कुटुंब न्यायालयांत समुपदेशकांची नियुक्ती केली गेली आहे. समुपदेशकांच्या प्रथमच बदल्या झाल्या आहेत. 

पुणे कुटुंब न्यायालयातील राजेंद्र तातार, अजित कदम यांना पुण्यात कायम ठेवले आहे. अंजली कोरे, सुरय्या खान (मुंबई), स्मिता जोशी (औरंगाबाद), संध्या  चव्हाण यांची मुंबई येथे बदली केली आहे. औरंगाबाद येथील राणी दाते, संजय तेलरांधे, मुंबईतील वीणा आठवले, सुनीता पुजार यांची पुण्यात बदली केली आहे. अकरा समुपदेशकांना सध्याच्या ठिकाणी कायम ठेवले आहे. राज्यातील काही समुपदेशकांविरुद्ध पक्षकारांनी तक्रारी केल्या होत्या. एकाच ठिकाणी अनेक वर्षे सेवा करीत असल्याने काही समुपदेशकांचे ‘महत्त्व’ वाढले होते.

Web Title: 34 Counselors transfer in Family Courts