esakal | पुणे शहरासाठी ३४ हजार लस उपलब्ध; आज १८९ केंद्रांवर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

पुणे शहरासाठी ३४ हजार लस उपलब्ध; आज १८९ केंद्रांवर लसीकरण

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - शासनाकडून महापालिकेला (Municipal) ३० हजार कोव्हीशील्ड (Covishield) व ४ हजार १०० कोव्हॅक्सीनचे डोस (Covaxin Dose) उपलब्ध झाले आहेत. शहरात शनिवारी (ता. १०) १८९ केंद्रांवर लसीकरण (Vaccination) करण्यात येणार आहे. (34000 Vaccine Available for Pune City)

महापालिकेकडील लस पुरवठा संपल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील लसीकरण बंद होते. मात्र, आता ३४ हजार १०० लस उपलब्ध झाल्याने १८३ ठिकाणी कोव्हीशील्ड आणि ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण होणार आहे. या केंद्रांवर १८ वयाच्या पुढील सर्वांना लस उपलब्ध होईल.

हेही वाचा: एआयसीटीई आणि डीआरडीओच्या सहकार्याने एम.टेक अभ्यासक्रम सुरू

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (१६ एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

- ६ केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

- ११ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

loading image