खडकवासल्यातून सलग 144 तास ३४२४ क्यूसेक विसर्ग

राजेंद्रकृष्ण कापसे
रविवार, 18 ऑगस्ट 2019

धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस थांबला असला तरी किरकोळ पाऊस पडत आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रात लहान- मोठे ओढ्यातून वाहत असल्याने खडकवासला धरणातील 3424 क्यूसेकचा विसर्ग मागील सहा दिवसांपासून सुरु आहे. 

खडकवासला (जि. पुणे) : धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस थांबला असला तरी किरकोळ पाऊस पडत आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रात लहान- मोठे ओढ्यातून वाहत असल्याने खडकवासला धरणातील 3424 क्यूसेकचा विसर्ग मागील सहा दिवसांपासून सुरु आहे. 

मागील रविवारी 11 जूनला पावसाचा जोर कमी झाला म्हणून सोमवारी(ता. 12 जून) दुपारी एक वाजता 3424 क्यूसेकचा विसर्ग पर्यत कमी केला. तो पूर्ण बंद होईल असे वाटत होते. परंतु धरण 100 टक्के भरल्याने पाणलोट क्षेत्रात किरकोळ पाऊस पडत आहे. त्यामुळे, दररोज पानशेत, वरसगाव व टेमघर पैकी दोन धरणातून किरकोळ विसर्ग सुरू असतो.

पानशेत- वरसगाव मधून 600 क्यूसेक पाणी वीज निर्मितीसाठी सोडले जाते. तर टेमघरमधून वीज निर्मितीसाठी 250 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे किमान चार ते साडे चार हजार क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा जात आहे. त्यामुळे, कालव्यातून एक हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. तर उर्वरित 3424 क्यूसेकचा विसर्ग पाणी धरणात जादा होत असल्याने ते नदीत सोडले जात आहे. 

सोमवारी(ता.12 जून) दुपारी एक वाजता हा विसर्ग सुरू केला तो रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत 144 तास होत आहे. या दरम्यान, धरणातून नदीत 1.77 टीएमसी पाणी सोडले आहे. विसर्ग कमी असला तरी सलग सहा दिवस पाणी सोडले जात आहे. सोडलेले पाणी शहरासाठी किमान एक महिना पुरेल एवढे पाणी सोडले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An 3424 cusec water released from khadakwasla dam in 144 hours