पुणे जिल्ह्यात ३४३ बालके कुपोषणमुक्त

malnutrition
malnutrition

पुणे - लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरच्या सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यातील ३४३ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ७७९ बालके तीव्र कुपोषित असल्याचे जिल्हा परिषदेच्यावतीने डिसेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १८३ बालके ही इंदापूर तालुक्यातील आहेत.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने दर महिन्यात बालकांची वजन घेण्यात येते आणि उंची मोजली जाते. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने वयानुसार बालकांचे किमान वजन किती असले पाहिजे, याचे निकष निश्‍चित केले आहेत. या निकषाच्या आत वजन आणि उंची भरल्यास, संबंधित बालक हे कुपोषित समजले जाते, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) दत्तात्रेय मुंडे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च २०२०मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ९८९ कुपोषित बालके आढळून आली होती. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्चला पुणे शहरात सापडला. त्यानंतर शहर व जिल्ह्यात संसर्ग वाढू लागला. त्यातच २४ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. परिणामी एप्रिल आणि मे ही दोन महिने हे सर्वेक्षण झाले नव्हते. मार्चनंतर जून महिन्यात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात १ हजार १२२ कुपोषित बालके आढळून आली होती. या दोन्ही अहवालातील आकडेवारीनुसार लॉकडाउनच्या १३३ कुपोषित बालके वाढल्याचे निदर्शनास आले होते. 

दरम्यान, डिसेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात हे सर्वेक्षण पुन्हा करण्यात आले. त्यात ७७९ कुपोषित बालके आढळून आली आहेत. यावरून लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरच्या सुमारे सहा महिन्यांच्या कालखंडात ३४३ बालके कुपोषणमुक्त झाल्याचे आढळून आल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

डिसेंबर व जूनमधील कुपोषित बालके 
(कंसात जूनमधील आकडे) 

जुन्नर    ८२     (१५१)
आंबेगाव    ५१     (१०६)
दौंड    २७     (७१)
बारामती    ६२     (८५)
हवेली    १२६     (१२६)
मुळशी    ०६     (३४)
भोर    ४१     (४४)
पुरंदर    ३६    (६८)
वेल्हे    २४     (४०)
खेड    ४६    (१२०)
इंदापूर    १८३     (१३१)
मावळ    ४८     (५५)
शिरूर    ४७     (९१).

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com