बारामतीमध्ये 35 उमेदवार कोट्यधीश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

पंचायत समिती मतदारसंघातून सुवर्णा नानासाहेब भापकर, शारदा राजेंद्र खराडे, रेखा रामचंद्र आटोळे, रमेश दिनकर देवकाते, अशोक दिनकर देवकाते, भारत यशवंत गावडे, शिवाजी जयसिंग कोकरे, सोपान जगन्नाथ भोंडवे, राहुल दत्तात्रेय भापकर, हनुमंत हंबीरराव भापकर, मेनका नवनाथ मगर, अश्विनी धनंजय गडदरे, संदीप मारुती चोपडे, राहुल विठ्ठल झारगड असे 14 उमेदवार कोट्यधीशांच्या यादीत आहेत.

बारामती - यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये बारामती तालुक्‍यात दाखल झालेल्या उमेदवारांत जिल्हा परिषदेचे 21, तर पंचायत समितीचे 14 असे एकूण 35 उमेदवार कोट्यधीश श्रेणीतील आहेत. यामध्ये उमेदवाराची स्वतःची जंगम, स्थावर; तसेच पती किंवा पत्नी व अवलंबितांची मिळून असलेल्या मालमत्तेचा समावेश आहे. 

इतर काही उमेदवारांनी पाच हजारांपासून ते एक लाख व त्यापुढेही एक लाख ते एक कोटी या टप्प्यात आपल्या मालमत्तांचे विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. या विवरणानुसार या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी 35 उमेदवार कोट्यधीश आहेत. 

जिल्हा परिषद मतदारसंघातून दिलीप शंकर खैरे, पोपट गणपतराव पानसरे, भरत मल्हारी खैरे, रोहित राजेंद्र पवार, सोनाक्षी योगेंद्रसिंह जाधवराव, रोहिणी रविराज तावरे, विजया रंजनकुमार तावरे, उषादेवी धैर्यशील तावरे, सुनील नारायण भगत, किसन दिनकर तांबे, सुनील दत्तात्रेय ढोले, विश्वासराव नारायण देवकाते, प्रमोद भगवानराव काकडे, सौरभ प्रमोद काकडे, तानाजी गुलाबराव गायकवाड, धैर्यशील रमेश काकडे, तेजश्री अविनाश देवकाते, वैशाली संजय तावरे, अश्विनी युवराज तावरे, नीलम राहुल तावरे, मीनाक्षी किरण तावरे असे एकूण 21 उमेदवार कोट्यधीश आहेत. 

पंचायत समिती मतदारसंघातून सुवर्णा नानासाहेब भापकर, शारदा राजेंद्र खराडे, रेखा रामचंद्र आटोळे, रमेश दिनकर देवकाते, अशोक दिनकर देवकाते, भारत यशवंत गावडे, शिवाजी जयसिंग कोकरे, सोपान जगन्नाथ भोंडवे, राहुल दत्तात्रेय भापकर, हनुमंत हंबीरराव भापकर, मेनका नवनाथ मगर, अश्विनी धनंजय गडदरे, संदीप मारुती चोपडे, राहुल विठ्ठल झारगड असे 14 उमेदवार कोट्यधीशांच्या यादीत आहेत. 

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्यांना दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा होऊ शकेल, अशी प्रलंबित प्रकरणे असलेल्या उमेदवारांची संख्या आठ असून, पंचायत समिती उमेदवारांत ही संख्या सात इतकी आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेसाठी 16 पदवीधर, तर 7 पदव्युत्तर उमेदवार असून, पंचायत समितीसाठी ही संख्या अनुक्रमे 21 व 7 इतकी आहे. 
 
Web Title: 35 candidates millionaire in Baramati