साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. आठ पोलिस उपायुक्तांसह शहर पोलिसांच्या विविध पथकांवरही वारीच्या बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे. पालखीच्या शहरातील आगमनापासून प्रस्थानापर्यंतचा चोख बंदोबस्त पोलिसांनी केला आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी शुक्रवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गुरुवारी देहू येथून प्रस्थान झाले आहे. दोन्ही पालखी रथ व दिंड्यांचे शनिवारी शहरात आगमन होत आहे. त्या दृष्टीने शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दल, गुन्हे प्रतिबंधक पथक, बाँबशोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल यांसारखी पथके बंदोबस्तात असणार आहेत.

वाहतूक पोलिस 
पोलिस उपायुक्त..............१ 
सहायक पोलिस आयुक्त...... ३
पोलिस निरीक्षक............२९
पोलिस उपनिरीक्षक.........४० 
पोलिस कर्मचारी........१००० 
होमगार्ड................१५०

पोलिसांची संख्या 
पोलिस उपायुक्त..............८ 
सहायक पोलिस आयुक्त....१५
पोलिस निरीक्षक ........... ७५ 
सहायक व उपनिरीक्षक...१८४
पोलिस कर्मचारी .......१८३०

साध्या वेशातील पोलिस 
पोलिस उपायुक्त..............१ 
सहायक आयुक्त..............२ 
पोलिस निरीक्षक ..............६
सहायक व उपनिरीक्षक ......११ 
पोलिस कर्मचारी ............७५

Web Title: 3500 police bandobast for Palkhi Sohala