बारामतीत साडेतीन हजार दूरध्वनी बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

बारामती शहर - ‘बीएसएनएल’च्या अंतर्गत वादाचा फटका येथील सुमारे साडेतीन हजार दूरध्वनी ग्राहकांना नाहक सहन करावा लागला. शहरातील साडेतीन हजार दूरध्वनी बुधवारी (ता. २३) सायंकाळी सहापासून आज (ता. २४) दुपारी दोनपर्यंत बंद होते. कारण, ‘बीएसएनएल’च्या वरिष्ठ कार्यालयाने वीजबिल भरण्यासाठी निधी न दिल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 

वीज बचतीचा मार्ग अवलंबण्यासाठी प्रत्येक एक्‍स्चेंजने दर महिन्यात किमान वीस टक्के ऊर्जाबचतीचे उद्दिष्ट गाठण्याचे बंधन घालण्यात आले होते. मात्र, असा काही फतवा निघाल्याची बारामतीतील बीएसएनएलच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना माहितीच नव्हती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासूनचे तब्बल अकरा लाखांचे बिल थकल्याने अखेर महावितरणने बीएसएनएलचा वीजपुरवठा बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास खंडित केला. मात्र, बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दोन जनित्राच्या (जनरेटर) साहाय्याने ब्रॉडबॅंड व वीजलाइन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी दोनच्या सुमारास दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली होती. 

उफराटा कारभार
एकीकडे वीजबिलात बचत करून काटकसर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘बीएसएनएल’कडून दुप्पट पैसे मोजून डिझेल विकत आणून जनरेटरवर एक्‍स्चेंज चालविण्याचा अजब कारभार आज पाहायला मिळाला. वीजबिल भरले असते तर डिझेलचे अतिरिक्त पैसे वाचले असते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिझेलचे पैसे गेले तरी चालतील; पण वीजबिलात बचत व्हायला हवी, असा विचित्र हट्ट धरल्याचे समजल्याने अनेकांनी कपाळावर हात मारून घेतला.

वरिष्ठ कार्यालयाशी तातडीने संपर्क साधून गुरुवारी संध्याकाळपर्यंत वीजबिलाबाबत काहीतरी मार्ग काढण्यात येईल. 
- संजय मोरे, अभियंता, बीएसएनएल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35000 Phone close in baramati for bill