पुरंदर विमानतळासाठी 3,515 कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २ हजार ३६७ हेक्‍टर जागा संपादित करण्याच्या सुमारे ३ हजार ५१३ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले. 

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सात गावांतील जागा राज्य सरकारकडून विमानतळासाठी निश्‍चित करण्यात आली आहे. या जागेला केंद्राच्या विविध विभागांकडून मंजुरी मिळाली आहे. 

या विमानतळासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या स्तरावर प्रलंबित होता. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत विमानतळाच्या भूसंपादनासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये जमिनीच्या मोबदल्यापोटी २ हजार ७१३ कोटी रुपये; तर फळझाडे, विहिरी, ताली इत्यादीसाठी ८०० कोटी रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे. हे विमानतळ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर उभारणार आहे. 

Web Title: 3515 Crore for the Purandar Airport