esakal | Breaking : पुणे जिल्ह्यात दुसऱ्यांदा रुग्णांचा आकडा साडेतीन हजारापार!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Patients

दिवसभरात तब्बल ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी ३३ रुग्ण आहेत.

Breaking : पुणे जिल्ह्यात दुसऱ्यांदा रुग्णांचा आकडा साडेतीन हजारापार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांनी गुरुवारी (ता.२०) दुसऱ्यांदा साडेतीन हजार रुग्णांचा आकडा क्रॉस केला आहे. गेल्या सुमारे साडेपाच महिन्यातील अशी ही दुसरी वेळ आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात तीन हजार ५४४ नवे रुग्ण सापडले आहेत. 

याआधी तीन आठवड्यांपूर्वी म्हणजेच ३० जुलै रोजी पहिल्यांदा दिवसभरातील नव्या रुग्णांचा साडेतीन हजाराचा आकडा क्रॉस झाला होता. त्यावेळी एकाच दिवसात ३ हजार ६१२ रुग्ण आढळून आले होते.

'पडत्या काळात मंडळ कामाला आलं'; बांधकाम कामगारांनी भावना केल्या व्यक्त

गेल्या चोवीस तासांत सापडलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ६६९ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार १०५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५६२, नगरपालिका क्षेत्रात १३४ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ७४ रुग्ण आढळून आले आहेत. 

दरम्यान, दिवसभरात तब्बल ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी ३३ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १७, जिल्हा परिषद क्षेत्रातील १६, नगरपालिका क्षेत्रातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही बुधवारी (ता.१९) रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी (ता.२०) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

यंदा पुण्यानं घेतली आघाडी; स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 'टॉप-२०'मध्ये!​

पुणे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ३५ हजार ८३७, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख २ हजार ८५१ तर  रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३ हजार ३६१ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये  पुणे जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top