अकरावीच्या दुसऱ्या फेरीत 3547 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 304 कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरी विशेष फेरी शनिवारी संपली. आता उर्वरित विद्यार्थ्यांना एफसीएफएस फेरीत प्रवेशाची संधी मिळू शकणार आहे. दरम्यान दुसऱ्या विशेष फेरीत 8,419 विद्यार्थी पात्र ठरले होते.

पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीत 5,555 विद्यार्थ्यांची निवड झाली होती, त्यापैकी 3,547 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केला आहे. या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शनिवारपर्यंतची मुदत दिली होती. अद्यापही अकरावीच्या प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 304 कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरी विशेष फेरी शनिवारी संपली. आता उर्वरित विद्यार्थ्यांना एफसीएफएस फेरीत प्रवेशाची संधी मिळू शकणार आहे. दरम्यान दुसऱ्या विशेष फेरीत 8,419 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी 5,555 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यातील 3,733 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संमती दर्शविली. तर शनिवारपर्यंत प्रत्यक्ष 3,547 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केला. या फेरीतील 1,782 विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले आहे.

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर
आता या प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात "प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' फेऱ्यांचे आयोजन करण्याला शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे एफसीएफएस फेरीचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर केले जाईल, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3547 students took admission in the second round of XI