३६ हजार संपूर्ण पुणे जिल्ह्यातील थकबाकीदार ग्राहक अंधारात

Electricity-Cutting
Electricity-Cutting

पुणे - पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात गेले १० महिने एकही वीजबिल न भरलेल्या ३६ हजार १३९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सुमारे ८९ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी होती. कारवाईचा इशारा महावितरणने दिल्यापासून एकही वीजबिल न भरलेल्या ९७ हजार ४१३ ग्राहकांनी आतापर्यंत १४५ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १० लाख ८ हजार ७७६ ग्राहकांकडे ८१९ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती ८ लाख ४९ हजार ९९० ग्राहकांकडे ५०५ कोटी २३ लाख, वाणिज्यिक १ लाख ३८ हजार ६४८ ग्राहकांकडे २११ कोटी ७० लाख, तर औद्योगिक २० हजार १३८ ग्राहकांकडे १०२ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

पुणे शहरातील (कंसात थकबाकी) १९ हजार ३८८ (४२.१७ कोटी), पिंपरी व चिंचवड शहर ९ हजार ८८५ (२४.९० कोटी) आणि हवेली ग्रामीण, मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ व खेड तालुक्यातील ६ हजार ८६६ (२२.४८ कोटी) थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरू
वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांना घरबसल्या चालू व थकीत वीजबिल ऑनलाइन भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाईल अॅपची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे रविवारपर्यंत (ता. २१) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com