खूषखबर, म्हाडाची जानेवारीत 3700 घरांसाठी सोडत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे : म्हाडाच्या वतीने बुधवारी पुण्यात 812 घरांची सोडत काढण्यात आली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत तसेच पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. या सोडतीमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील २४२ आणि पिंपरी-चिंचवडमधील ५७० आशा ८१२ घरांसाठी सोडत होती यासाठी 36 हजार 568 लोकांनी घरांसाठी अर्ज केले होते

पुणे : म्हाडाच्या वतीने बुधवारी पुण्यात 812 घरांची सोडत काढण्यात आली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत तसेच पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. या सोडतीमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील २४२ आणि पिंपरी-चिंचवडमधील ५७० आशा ८१२ घरांसाठी सोडत होती यासाठी 36 हजार 568 लोकांनी घरांसाठी अर्ज केले होते.<

पुण्यात मोहम्मदवाडी, पाषाण, येवलेवाडी, आंबेगाव तर पिंपरीमध्ये वाकड, रहाटणी, चिखली यासह अनेक ठिकाणी घरे होती.या घरांच्या किमती दहा लाख ९२ हजार सहाशे रुपये ते १९ लाख ५६  हजार १३४ रुपये दरम्यान आहेत. या घरांसाठी २१ नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यात आले होते. सहा डिसेंबर पर्यंत ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्यात आले. यावेळी अनेक जणांनी पहिल्यादा घरासाठी अर्ज केला आणि त्यांना घरे मिळाली अशा सर्वांनी समाधान व्यक्त केले.

या सोडतीमध्ये ज्यांना स्वप्नातील घर मिळालं त्यांचे अभिनंदन. मात्र, ज्यांना घर मिळाले नाही, अशा लोकांनी आता निराश व्हायची गरज नाही. कारण पुढच्या महिन्यातच जानेवारीमध्ये 3700 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात 2600 घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.
 

Web Title: 3,700 houses draw for MHADA in january