बारामती तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 38 उमेदवार रिंगणात

संतोष आटोळे 
गुरुवार, 17 मे 2018

शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या15 ग्रामपंचायती पैकी मगरवाडी व भोंडवेवाडी या ग्रामपंचायतीते सरपंच व सदस्य यांची बिनविरोध निवड झाली. तर दंडवाडीचे सरपंचपद बिनविरोध झाले आहे. इतर 12 गावांच्या सरपंच पदासाठी 38 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. 143 सदस्य पदाच्या जागांपैकी 53 जागा बिनविरोध व 2 जागा रिक्त राहिल्या आहेत. तर उर्वरित 88 जागांसाठी 194 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हनुमंत पाटील, निवासी तहसिलदार आर.सी.पाटील यांनी दिली.

यामध्ये भोंडवेवाडी व मगरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पद भोंडवेवाडीच्या सदस्य पदाच्या 9 जागा व मगरवाडीच्या सदस्य पदाच्या 7 जागांसह संपूर्ण ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाली आहे. तर दंडवाडी येथील सरपंचपद बिनविरोध तर सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 18 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. बुधवार (ता.16) रोजी अर्ज माघारी नंतर सर्व गावांच्या निवडणुकींचे चित्र स्पष्ट झाले आहे 

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये गोजुबावी येथील सदस्य पदाच्या दोन जागा, सांगवी एक जागा मोरगाव एक जागा व वाकी एक जागा अशा पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर वडगाव निंबाळकर व मेडदमध्ये पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. 

ग्रामपंचायतीचे नाव, सरपंच पदासाठी अर्ज संख्या, तर कंसात सदस्य संख्या व बिनविरोध सदस्य संख्या व निवडणुक होणारी सदस्य संख्या व उमेदवार संख्याखालील प्रमाणे..

कोऱ्हाळे खुर्द - 3 - (11 - 0 - 11 - 27) 
सुपे - 3 - (13 - 5 - 8 - 19)
वंजारवाडी - 3 - (9 - 3 - 6 -12)
करंजे - 4 - (9 - 7 - 2 - 5)  
मगरवाडी - (बिनविरोध)
भोंडवेवाडी - (बिनविरोध)
चांदगुडेवाडी - 2 - (9 - 0 - 9 - 18)
दंडवाडी - बिनविरोध - (9 -रिक्त 2 जागा 7 - 14)
जराडवाडी - 4 - (9 - 7 - 2 - 4)
काळखैरेवाडी - 4 - (9 - 2 - 7 - 14)
कुतवळवाडी - 3 - (9 - 3 - 6 - 14) 
पानसरेवाडी - 3 - (9 - 2 - 7 - 14)
साबळेवाडी - 2 - (9 - 3 - 6 - 12)
शिर्सुफळ - 4 - (13 - 1 - 12 - 31)
उंडवाडी क.प. - 3 - (9 - 4 - 5 -10)
एकुण - 38 - (143 - 53 - 90 - 194)

Web Title: 38 candidates will be elected for the post of 12 panchayat sarpanch in Baramati taluka