आरटीईच्या पहिल्या फेरीत 38 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठीच्या पहिल्या फेरीत शुक्रवारपर्यंत राज्यातील ३७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शाळा जाहीर झाल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले आहे.

या प्रवेश प्रक्रियेत शाळा प्रवेश नाकारत असल्याने शिक्षण विभागाला प्रवेशासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी १४ ते २४ मार्चपर्यंत मुदत होती. मात्र शाळांनी मुलांना प्रवेश नाकारल्याने ही मुदत ४ एप्रिल, १० एप्रिल आणि १३ एप्रिल अशी टप्प्या-टप्प्याने वाढविली. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत ‘अंतिम’ मुदत दिली होती. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेवरून काही शाळांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत, असे उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची दुसरी फेरी (लॉटरी) आणि पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी आणखी मुदतवाढ या संदर्भातील निर्णय सोमवारी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 38 thousand students admitted in the first round of RTE