Loksabha 2019 : मतदार यादीतून ३९ लाख नावे वगळली

Loksabha 2019 : मतदार यादीतून ३९ लाख नावे वगळली

पुणे - राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीतून वगळलेल्या नावांचा आढावा घेण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण  करण्यात आले. यात राज्यातील ३९ लाखांपेक्षा अधिक नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती फोरम फॉर कॉन्स्टिट्यूशन नॅशनॅलिझमचे अध्यक्ष प्रशांत कोठाडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोठाडिया म्हणाले, ‘‘मतदार जागृती परिषद, फोरम फॉर कॉन्स्टिट्यूशन नॅशनॅलिझम या संस्थांनी दि नो व्हॉटर्स लेफ्ट बहाइंड आणि रेलॅब्स टेक्‍नॉलॉजीसच्या सहकार्याने राज्यातील सुधारित मतदार यादी आणि भारताच्या जनगणनेची आकडेवारी यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्याशिवाय नागपूरच्या पश्‍चिम आणि दक्षिण भाग, काटोल आणि नांदेड या भागातही सर्वेक्षण करण्यात आले. यात राज्यातील सुमारे ३९ लाखांपेक्षा अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे या संस्थांनी मतदारांची पुनर्नोंदणी करण्यासाठी मिसिंगव्होटर्स ॲपची निर्मिती केली आहे. राज्यातील कोणत्याही कारणास्तव मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात आल्यास त्यांनी missingvoters या ॲपवर त्यांच्या नावाची पुनर्नोंदणी करावी. या ॲपमुळे नव्याने ऑनलाइन अर्ज आणि सरकारी कागदपत्रांच्या आधारे नावनोंदणी करता येते. ही नोंदणी ३० मार्चपर्यंत करता येणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com