Vidhansabha 2019 भोसरीत दुपारी तीनपर्यंत उत्साही ३९.८२ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पावसाने उघडीप दिल्याने भोसरी मतदारसंघात उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत ३९.८२ टक्के मतदान झाले.

पिंपरी (पुणे) : पावसाने उघडीप दिल्याने भोसरी मतदारसंघात उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत ३९.८२ टक्के मतदान झाले.
मतदारसंघात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ४२ हजार ४५६ पुरुष मतदार, २४ हजार २०३ महिला अशा एकूण ६६ हजार ६६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय, मनपा सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, दिघी रस्त्यावरील आदर्श विद्यालय, दिघी, मोशी, चिखली, तळवले येथे मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावून मतदान केले.
प्रत्येक ठिकाणी मतदार सहायता कक्षा अंतर्गत मतदार याद्यांमधून मतदारांची नावे शोधून त्यांना मतदार चिठ्ठ्या देण्यात येत होत्या.

 दुपारी तीनपर्यंत १०१६३२ पुरुष, ७४०३७ महिला, व इतर ३ अशा १७५६७२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी अनुक्रमे ४२.०७, ३७.११ व ९.६८ टक्के होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 39 percent voting till 3 PM in Bhosari

टॅग्स