थ्रीडीपासून व्यक्तिचित्रांपर्यंत ‘इंद्रधनू’ची दुनिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - थ्रीडी रांगोळीतील अमिताभ बच्चन...‘पाणी वाचवा’चा संदेश देणारी रांगोळी....रांगोळीतून उलगडलेला बालशोषणासारखा गंभीर विषय अन्‌ रांगोळीतून उमटलेले मातृत्वाचे विविधांगी पैलू अशा वैविध्यपूर्ण रांगोळ्यांचे जग रसिकांना ‘इंद्रधनू’ या प्रदर्शनात पाहायला मिळाले. विविध रंगावलीकारांनी एकत्र येऊन थ्रीडीपासून ते व्यक्तिचित्रांतील रांगोळ्याची दुनिया साकारली असून, सुमारे ३२ रांगोळ्यांमधून विविधांगी विषयांवर रंगावलीकारांनी भाष्य केले आहे.

रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्‌घाटन शनिवारी अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात मनमोहक रांगोळ्यांमधून अनेक विषय हाताळण्यात आले आहेत. अक्षय शहापूरकर या वेळी उपस्थित होते. 

या प्रदर्शनात पाणी वाचवा, स्वच्छ भारत अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, वृद्धाश्रम, बालकामगार, कचरा नियोजन, सर्वधर्म समभाव आदी ज्वलंत विषयांवरील रांगोळ्या पाहायला मिळतील. त्याशिवाय स्थिर चित्र, निसर्गचित्र, थ्रीडी रांगोळी यात पाहता येईल. 

नीता पवार, जान्हवी जाधव, स्वप्नाली काळे, आरती खिस्ती, मनीषा दीक्षित, प्रीती घोडके, अपर्णा बोरावले आणि मनीषा उदापुरे आदी रंगावलीकारांच्या रांगोळी प्रदर्शनात पाहता येतील. 

हे प्रदर्शन मंगळवारपर्यंत (ता. २२) सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत पाहावयास खुले राहील.

रांगोळी हे चित्रकलेचे श्रेष्ठत्तम माध्यम आहे. ही कला अल्पायुषी असली तरी त्यात मोठा भावार्थ लपलेला असतो. माणसाच्या मनात उमटलेल्या विविध पैलूंना शाश्‍वत रूप देणारी ही कलाकृती आहे. म्हणूनच रंगावलीकार आपल्या या कलेतून प्रत्येकाच्या स्मृतीत जिवंत राहतो.
- योगेश सोमण, अभिनेते

Web Title: 3d drawing indradhanu exhibition