मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूकीचा 4 तास खोळंबा; वाहनचालकांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आज सकाळी ट्रेलरवरील अवजड कॉईल मार्गावर पडल्याने पुण्याकडे येणारी वाहतुकीचा सुमारे चार तास खोळंबा झाला. द्रुतगतीवर विशेषतः पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याने आडोशी बोगद्यापर्यंत पाच ते सहा किलोमीटरवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यात अमृतांजन पुलाजवळील चढावर वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. 

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ आज सकाळी ट्रेलरवरील अवजड कॉईल मार्गावर पडल्याने पुण्याकडे येणारी वाहतुकीचा सुमारे चार तास खोळंबा झाला.
Pune Mumbai Express way
द्रुतगतीवर विशेषतः पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याने आडोशी बोगद्यापर्यंत पाच ते सहा किलोमीटरवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यात अमृतांजन पुलाजवळील चढावर वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. 
Amurtanjan brideg

शनिवार असल्याने नागरिक, पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने द्रुतगतीवर वाहनांची संख्या मोठी होती, त्यामुळे गर्दीत अजून भर पडली. वाहतुक कोंडीमुळे अवजड क्रेन घटनास्थळी दाखल होण्यास वेळ लागला. बोरघाट पोलीस मदत केंद्र, खंडाळा वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खंडाळा बोगद्याच्या अलीकडे थांबवित पुण्याकडे जाणारी वाहतूक मुंबई बाजूकडून सुरू केली. यामुळे मुंबईला जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती.

चार तासानंतर पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक टप्प्या-टप्प्यात सुरू केली. मात्र वाहनांच्या रांगा लांब गेल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. सकाळी- सकाळी वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 hour traffic delay on Mumbai-Pune Express way