पिंपरीत गॅस स्फोट‍ामध्ये चार जण जखमी 

संदीप घिसे 
शुक्रवार, 15 जून 2018

पिंपरी (पुणे) : गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले. ही घटना पिंपरीतील नेहरूनगर भागात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. दुर्गेश सिंग (वय 12), शिवा सिंग (वय 10) हा 65 टक्के भाजला आहे. संदीप सिंग (वय 21), लबला देवी सिंग (वय 32) हे ही भाजले आहेत.

हा स्फोट एवढा मोठा होता की घराचे पत्रे उडाले. अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग विझवली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे सर्व जखमींवर वायसीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Web Title: 4 injured in gas spot in pimpari