चार किलो सोन्याची बिस्किटे जप्त

विमानतळ - दुबईहून आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात आढळलेले  चार किलो सोने जप्त करणारे केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे अधिकारी.
विमानतळ - दुबईहून आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात आढळलेले चार किलो सोने जप्त करणारे केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे अधिकारी.

पुणे - दुबईहून विमानाद्वारे तस्करी करून आणले जात असलेले सव्वाकोटी रुपये किमतीची  चार किलो सोन्याची बिस्किटे केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे जप्त केले. सोन्याची बिस्किटे विमानाच्या स्वच्छतागृहांमध्ये आढळून आले होते.

दुबईहून निघालेले स्पाईस जेट कंपनीचे एसजी ५२ हे विमान गुरुवारी पहाटे साडेचार वाजता पुणे विमानतळावर उतरले. प्रवासी उतरविल्यानंतर संबंधित विमान हे बंगळूरला जाणार होते. बंगळूरला जाणाऱ्या प्रवाशांची पुण्यामध्ये तपासणी होत नाही. त्यामुळे प्रवाशांना सोन्याची तस्करी करता येते. दरम्‍यान, अधिकारी संबंधित विमानाची तपासणी करत होते. स्वच्छतागृहाची तपासणी करत असतानाच काळ्या टेपमध्ये गुंडाळलेली चार किलो सोन्याची बिस्किटे आढळून आली. अधिकाऱ्यांनी ही बिस्किटे जप्त केली. सहआयुक्त राजेश रामाराव, उपायुक्त हर्षल मेटे, अधीक्षक सुधार अय्यर व सीमा शुल्क अधिकारी देशराज मीना यांच्या पथकाने सोने जप्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com