दौंड : मेडीकलमध्ये चोरी, 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस

crime
crime

दौंड (पुणे) : दौंड शहराजवळील लिंगाळी (ता. दौंड) येथील पल्लवी मेडीकल मध्ये झालेल्या चोरीत 4 लाख 34 हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन चोरटे दिसून आले आहेत. 

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी आज (ता. 24) या बाबत माहिती दिली. लिंगाळी येथे डॅा. सोनोने हॅास्पिटल समोरील पल्लवी मेडीकल मध्ये 23 सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी ही चोरी झाली. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडण्यासह शटर उचकटले व त्यापैकी एकाने तोंडावर मास्क आणि हातात ग्लोव्हज घालून आत प्रवेश केला. दुकानाच्या समोरील बाजूच्या काउंटरमधील कुलूपबंद ड्रॅाव्हर उचकटून त्यामध्ये ठेवलेली 4 लाख 34 हजार 300 रूपयांची रोकड चोरट्याने चोरून नेली. 23 सप्टेंबरला सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी निदर्शनास आली.

औषध विक्रीतून आलेली रक्कम एकत्रित करून सदर रक्कम औषध पुरवठादारांना सोमवारी (ता. 24) आरटीजीएस द्वारा ट्रान्सफर करावयाची असल्याने दुकानाचे मालक मुकुंद माधवराव वाघ यांनी सदर रोकड दुकानात ठेवली होती. मुकुंद वाघ यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन चोरटे दिसून येत असून ते 22 ते 30 वयोगटातील आहेत. दोघांनी फुल बाह्यांचे टी शर्ट घातले असू दुकानाबाहेर थांबलेल्या चोरट्याने ट्रॅक पॅण्ट तर चोरी करणाऱ्याने जीन्स पॅण्ट घातलेली आहे. सदर चोरी पाळत ठेवून केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस शोध घेत आहेत. सहायक निरीक्षक धनंजय कापरे या प्रकारात पुढील तपास करीत आहेत.

दौंड शहरात 21 सप्टेंबरला जनता कॅालनी मध्ये पाच अपार्टमेंट मधील बंद सदनिकांमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोड्यांमध्ये एकूण 1 लाख 74 हजार 500 रूपयांचा एेवज चोरीस गेलेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com