गडकरींचा पुतळा हटविणाऱ्यांना 6 दिवसांची कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली असा आरोप करीत गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या चौघांना याप्रकरणी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
संभाजी उद्यानातील गडकरी यांच्या पुतळ्याची मंगळवारी (ता. 3) पहाटे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी चौघांना अटक केली. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली. 

महापालिकेचे संभाजी उद्यान जंगली महाराज रस्त्यावर आहे. ते मध्यरात्री बंद असताना चार तरुणांनी उद्यानात प्रवेश केला. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच गडकरी यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्याभोवती कारंज्यासाठी पाण्याचा हौद करण्यात आला आहे. या हौदात प्रवेश करून त्यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता पुतळ्याची तोडफोड करून तो शेजारच्या मुठा नदीत टाकला. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही पुतळा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
दरम्यान, महापौर प्रशांत जगताप यांनी त्या ठिकाणी पूर्ववत पुतळा बसविण्यात येईल, अशी घोषणा केली. 

नागरिकांसाठी उद्यान सकाळपासून बंद ठेवण्यात आले. या घटनेची बातमी मंगळवारी सकाळी सर्वत्र पसरल्याने यामुळे गोंधळ उडू नये, म्हणून उद्यानाच्या परिसरात पोलिसांनी लगेचच बंदोबस्त वाढवला. पालिकेतर्फे उद्यानात कसलीही सुरक्षितता नव्हती, हे यानिमित्ताने समोर आले आहे. या घटनेनंतर राजकारणाबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 

Web Title: 4 sent to police custody for felling ram ganesh gadkari statue