बचत गटांच्या ४० बस पीएमपी घेणार

बचत गटांच्या ४० बस पीएमपी घेणार

पुणे - माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांच्या बचत गटांकडून सीएनजीवर धावणाऱ्या ४० बस पीएमपीएमएल भाडेतत्त्वावर घेणार आहेत. तीन महिन्यांत या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होतील. 

माजी सैनिकांच्या १३ पत्नी आणि विधवांच्या ५० बचत गटांच्या माध्यमातून ही बस खरेदी होणार आहे. या बस पीएमपीएमएलने भाडेत्त्वावर घ्याव्यात, असा प्रस्ताव विश्‍वयोद्धा शेतकरी मल्टिपर्पज प्रायव्हेट लिमिटेडने पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाला दिला होता. त्याला संचालक मंडळाने बुधवारी मंजुरी दिली. माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांच्या बचत गटांना केंद्रीय सैनिक बोर्डाकडून दहा लाखांचे अनुदान मिळते. तसेच या गटांना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून सवलतीच्या दरात कर्ज मिळते. त्याच्या आधारे बसची खरेदी होणार आहे. पीएमपीएमएल खासगी कंत्राटदारांकडून ज्या दराने बस भाडेतत्त्वावर घेते, त्याच दराने सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक, संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. 

उत्पन्नाचे साधन 
सातारा येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल आर. आर. जाधव यांनी या प्रस्तावासाठी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता. या बसच्या माध्यमातून जवानांच्या पत्नी आणि विधवांना उत्पन्नांचे साधन मिळणार आहे. त्यामुळे संचालक मंडळाने प्राधान्याने त्यांचा ठराव मंजूर केला, असेही टिळक यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com