पुणे जिल्ह्यातील ४३ गावे भर पावसाळ्यात तहानलेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Tanker

पुणे जिल्ह्यातील ४३ गावे आणि २८३ वाड्या-वस्त्या या भर पावसाळ्यात तहानलेल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील ४३ गावे भर पावसाळ्यात तहानलेली

पुणे - पुणे जिल्ह्यातील ४३ गावे आणि २८३ वाड्या-वस्त्या या भर पावसाळ्यात तहानलेल्या आहेत. ही गावे आणि वाड्यांमधील ९९ हजार २७९ लोकसंख्येला ५२ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, दौंड, इंदापूर, मावळ आणि मुळशी हे चार तालुके टॅंकरमुक्त झाली आहेत.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १३ टॅंकर हे आंबेगाव तालुक्यात सुरु आहेत. सध्या जिल्ह्यातील चार तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य नऊ तालुक्यांतील ४३ गावे आणि २८३ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसलेल्या आंबेगाव तालुक्यातील ११ गावे आणि ७१ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ५५ खासगी विहीरींचे अधिगृहण करण्यात आले आहे. तालुकानिहाय सुरु असलेल्या टॅंकरची संख्या पुढीलप्रमाणे - आंबेगाव -१३, शिरूर -१२, जुन्नर, खेड प्रत्येकी - ०९, हवेली -५, बारामती, भोर, पुरंदर, वेल्हे प्रत्येकी एक.

जूनमध्ये सरासरीच्या ४३ टक्के पाऊस

पुणे जिल्ह्यातील जून महिन्यातील सरासरी पाऊस हा १७६ मिलीमिटर इतका आहे. यापैकी आतापर्यंत फक्त ७६ मिलीमिटर पाऊस पडला आहे. जून महिन्यातील पडलेल्या पावसाचे हे प्रमाण या महिन्यातील सरासरी पावसाच्या ४३ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक १२४ मिलिमिटर पाऊस हा जुन्नर तालुक्यात झाला आहे. मुळशी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ३६ मिलीमिटर पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यात झालेला पाऊस (मिलीमिटरमध्ये) - भोर - ५९, वेल्हे -१०६, मावळ -४९, हवेली -५६, खेड -६६, आंबेगाव - १०५, शिरूर -७७, पुरंदर - ६०, दौंड - ८७, बारामती - १०३ आणि इंदापूर - ८९.

Web Title: 43 Villages In Pune District Thirsty During Monsoon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punewaterMonsoonVillages