इंदापूर भवानीमाता मंदिरसाठी साडेचार कोटींचा निधी

राजकुमार थोरात
बुधवार, 4 एप्रिल 2018

वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील भवानीमाता मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत माध्यमातुन ४ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी दिली. 

वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील भवानीमाता मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत माध्यमातुन ४ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी दिली. 

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे भवानीमातेचे मंदिर आहे. या देवीच्या दर्शनासाठी पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर जिल्हातून भाविक दर्शनासाठी येत असतात. शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागातून पुणे जिल्हयासाठी ९ कोटी ४३ लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. यामध्ये लाखेवाडीच्या भवानी माता मंदिराच्या विकासासाठी ४ कोटी ५९ लाख ३३ हजारांच्या निधीचा समावेश आहे. यामुळे भवानीमाता मंदिराच्या परिसराचा सर्वांगिण विकास होणार असून, गावाचा कायापालट होण्यास मदत होणार असल्याचे ढोले यांनी सांगितले. यावेळी सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच वामनराव थोरवे उपस्थित होते.

भवानीमाता मंदिराच्या परीसरामध्ये होणारी विकासकामे..
भवानीमाता मंदीर ते विठ्ठल मंदीराच्या पादचारी मार्ग पुलाच्या कामासाठी (१ कोटी ३८ लाख  ५७  हजार रुपये), विठ्ठल मंदिर दगड कामासाठी ( ४६ लाख ३६ हजार रुपये ), जोड रस्त्यावर सुधारणा करण्यासाठी (१  कोटी  २५  लाख ७५  हजार रुपये), विठ्ठल मंदिराच्या  टेकडीवरती  पाण्याच्या टाकीसाठी ( १६  लाख  ९६  हजार रुपये) तर बागबगीचा तयार करण्यासाठी (३८ लाख रुपये), यात्री निवास बांधण्यासाठी (५० लाख ३९ हजार रुपये ), एलईडी पथदिवे बसविण्यासाठी (१५ लाख २७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

निधी मंजूर करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व दिलीप ढोले यांनी सहकार्य केल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी सांगितले. 

Web Title: 4.5 crore crores fund for Indapur Bhawanimata temple