सायकल शेअरिंगसाठी ४५ ठिकाणे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

पिंपरी -स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे शहरात सायकल सुविधा योजना (बायसिकल शेअरिंग) राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर ते वाकड रस्त्यासह क्षेत्रीय पायाभूत सुविधा तत्त्वावर निश्‍चित केलेल्या ४५ ठिकाणांची निवड केली आहे. त्यासाठी सायकल प्रायोजक कंपन्या आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झाला आहे. त्याअंतर्गत ‘बायसिकल शेअरिंग’ योजना राबविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर ते वाकड रस्त्यावर ही योजना राबविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नाममात्र दरात २०० सायकली उपलब्ध करून देण्याची तयारी यूलू, पेडल, मोबीसाईल आणि मोबिक या सायकल कंपन्यांनी दर्शविली आहे. प्रतितास नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. हे भाडे ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी लिमिटेड व प्रायोजक कंपन्या यांच्या अधिकार व कर्तव्याची जबाबदारी बैठकीत निश्‍चित करण्यात आली आहे. 

बैठकीतील निर्णय 
पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक सायकल सुविधा योजना
सार्वजनिक सायकल सुविधा योजना पूर्णत- प्रायोजक तत्त्वावर राबवावी
इच्छुक सायकल कंपन्यांना सहभागासाठी मान्यता देण्यात येईल
प्रायोजक कंपनीला पाच वर्षांसाठी परवानगी असेल
सायकल योजनेसाठी जादा कंपन्या इच्छुक असल्यास अन्य भागात सुविधा पुरविण्यास परवानगी देण्याचे अधिकार आयुक्त तथा स्मार्ट सिटी कंपनीला
महापालिका, स्मार्ट सिटी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार नाही

प्रायोजक कंपन्यांची जबाबदारी
स्वखर्चाने सायकल पुरवून देखभाल दुरुस्ती करणे
निर्धारित ठिकाणांवर सायकल पुरविणे
सायकलचालकाने रात्री इतरत्र सोडून दिलेल्या सायकली गोळा करणे
सायकल वापराचे दर आकारण्याचे संपूर्णत- अधिकार 
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण
सायकल फेरी दरात वाढ/घट करणे
सायकल वापर, वेळ, जमा महसूल याचा अहवाल दरमहा पाच तारखेला स्मार्ट सिटी कंपनीकडे देणे
अत्याधुनिक सुविधायुक्त सायकली, उच्च दर्जाची सेवा, समर्पित ॲप, अत्याधुनिक तांत्रिक सोयी पुरविणे
सायकल स्वाराला अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी

Web Title: 45 places for bicycle sharing in PCMC