पोलिसांच्या तत्परतेमुळे 'त्या' व्यक्तीला मिळाले जीवनदान

po.jpg
po.jpg

वाघोली : एका 45 वर्षीय व्यक्तीला लोणीकंद पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले. ही घटना पाच दिवसांपूर्वी पिंपरी सांडस ( ता.हवेली ) येथे घडली. रविंद्र दत्तात्रय कामठे असे प्राण वाचलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसानी दिलेल्या महितीनुसार, ही व्यक्ती पिंपरी सांडस परिसरात एका विहिरी जवळ बेशुद्ध अवस्थेत पडली होती. गावातील काही व्यक्ती लोणीकंद पोलीस ठाण्यात गेल्या. या व्यक्तीबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्परतेने त्या व्यक्तीकडे शेतात धाव घेतली. तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यांनी त्याला एक टेम्पोतून तात्काळ वाघोलीतील एका खाजगी रुग्णालयात हलविले. त्याच्या खिशात मोबाईल होता. त्याद्वारे त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याचे नाव कळले.

रुग्णालयात नेल्यानंतर तात्काळ उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. त्याचा रक्तदाब व ऑक्सिजन खूप कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे लोणीकंद पोलिसानी सांगितले. अजून थोडा उशीर झाला असता तर त्याच्या जीविताला धोका होता. तात्काळ उपचारानंतर तो व्यक्तीही शुद्धीवर आला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच उपचारानंतर त्याला घरीही सोडण्यात आले. ठाणे अंमलदार बाळासाहेब सकाटे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस कर्मचारी ऋषीकेश व्यवहारे, होमगार्ड परशुराम वाघमारे यांनी ही तत्परता दाखविली. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व रुग्णांच्या नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानत कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com