पुणे विभागात पूरग्रस्तांसाठी 450 कोटींचे वाटप : नीलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे विभागात जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीच्या नुकसानभरपाईसाठी 389 कोटी 35 लाख रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली

पुणे : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पुणे विभागात 516 कोटी 95 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, 449 कोटी 51 लाख रुपयांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पुणे विभागात जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीच्या नुकसानभरपाईसाठी 389 कोटी 35 लाख रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ही अनुदानाची रक्कम अद्याप प्राप्त झालेले नाही. तसेच पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीसाठी 220 कोटी 36 लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हे अनुदानही अद्याप प्राप्त झालेले नाही. 

खाते वाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार : जयंत पाटील 

गेल्या ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देण्यासाठी 525 कोटी 68 लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्याचे पूर्ण वाटप करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 450 Crores have been allotted for Pune Flood Victims says Neelam Gorhe

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: