बारामतीत वाहन प्रशिक्षणाच्या 75 जागांसाठी 450 महिलांचे अर्ज

मिलिंद संगई, बारामती
रविवार, 19 ऑगस्ट 2018

बारामती : सामाजिक परिवर्तन सुरु आहे याचा प्रत्यय देणारी एक बाब नुकतीच समोर आली. बारामती नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणा-या प्रशिक्षण शिबीरात यंदा प्रथमच चार चाकी वाहन शिकण्याचा समावेश केला गेला आणि 75 जागांसाठी तब्बल 450 महिलांनी या साठी अर्ज केले. 

महिला वेगाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत असे अनेकदा सांगितले जाते मात्र बारामती सारख्या निमशहरी भागात चार चाकी गाडी चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी इतक्या मोठ्या संख्येने महिलांचे आलेले अर्ज ही बाब सामाजिक परिवर्तनाचेच निदर्शक म्हणावी अशी आहे. 

महिलांचा या प्रशिक्षणाला मिळालेला इतका मोठा प्रतिसाद विचारात घेता आता जागांची संख्या वाढविण्याबाबत विचार सुरु असल्याचे नगरपालिका सूत्रांनी सांगितले. 
वाहन चालविता येणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे, या मुळे आपत्कालिन परिस्थितीत महिला सफाईदार वाहन चालवून मदत करु शकतात, या शिवाय आत्मविश्वास वाढविण्यासह अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशानेच अनेक महिलांनी या प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत. 

या योजनेअंतर्गत एकूण प्रशिक्षण शुल्काच्या फक्त दहा टक्के रक्कमच अर्ज केलेल्या महिलेने भरायची असून उर्वरित रक्कम महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने अदा केली जाणार आहे. संगणक, शिवणकाम या सारख्या प्रशिक्षणाला इतक्या दिवस महिलांचा चांगला प्रतिसाद प्राप्त व्हायचा, आता मात्र चार चाकी गाडी शिकण्याच्या या अभ्यासक्रमासाठीही महिला उत्सुक असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. 
उत्साह वाढला

महिला बाल कल्याण समितीचाही उत्साह महिलांच्या या प्रतिसादाने द्विगुणित झाला असून आता महिलांसाठी आणखी असेच काही अभ्यासक्रम सुरु करता येणे शक्य आहे का याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.
- पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बा.न.प. 

Web Title: 450 women's applications for 75 seats for vehicle training in Baramati