Loksabha 2019 : पुणे लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46 इच्छुक उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार (ता. 4) शेवटचा दिवस होता. 

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46 इच्छुक उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार (ता. 4) शेवटचा दिवस होता. 

पुणे मतदारसंघासाठी 28 मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. बुधवारपर्यंत भाजप-शिवसेना युतीचे गिरीश बापट, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, वंचित विकास आघाडीचे अनिल जाधव यांच्यासह 19 अर्ज दाखल झाले होते. आज शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. अर्जांची छाननी शुक्रवारी (ता. 5) होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (ता. 8) असून, मंगळवारी (ता. 23) रोजी मतदान होणार आहे. 

गुरुवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे 

राहुल धर्मा डंबाळे (अपक्ष), फैयाज मुस्ताक सय्यद राज (भारतीय किसान पार्टी), जावेद शब्बीर सय्यद (अपक्ष), शब्बीर साजनभाई तांबोळी (अपक्ष), कृपाल कृष्णराव पलुसकर (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), हेमंत बाबूराव कोळेकर-पाटील (अपक्ष), अमोल जयराज शिंदे (हम भारतीय पार्टी), अमोल जयराज शिंदे (अपक्ष), राहुल विश्‍वास जोशी (अपक्ष), अलताफ करीम शेख (अपक्ष), ऍड. महेश अरविंद गजेंद्रगडकर (स्वर्ण भारत पार्टी), विजय लक्ष्मण सरोदे (अपक्ष), इम्रान अन्वर शेख (अपक्ष), निखिल उमेश झिंगाडे (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), भरत बस्तीमल जैन (अपक्ष), अशोक प्रभूराव बोईनवाड (अपक्ष), सिमकुमार भगवान खिरीड (बहुजन महा पार्टी), कुमार देवबा काळेल (अपक्ष), आनंद प्रकाश वांजपे (अपक्ष), संजय बाबूराव जाधव (अपक्ष), बाळासाहेब तुकाराम मिसाळ (बहुजन मुक्‍ती पार्टी), रमेश देवाराम धर्मावत (पीपल्स युनियन पार्टी), अजान वकील मनियार (अपक्ष), राकेश प्रभाकर चव्हाण (अपक्ष), जयंत एकनाथ चिंचोलीकर (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), देवेंद्रकुमार दीनदयाल ठक्‍कर (अपक्ष), रवींद्र बन्सीराम महापुरे (अपक्ष), उत्तम पांडुरंग शिंदे (बहुजन समाज पार्टी), कांचन देवदास क्षीरसागर (अपक्ष), जाफर खुर्शीद चौधरी (अपक्ष), अंकुशराव शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी), गोरख नारायण घोडके (अपक्ष), दयानंद राम अडागळे (अपक्ष), सुहास पोपट गजरमल (राष्ट्रीय जनशक्‍ती पार्टी, सेक्‍युलर), अजय वसंत पैठणकर (अपक्ष) आणि हणमंत महादेव नलावडे (आंबेडकराईट पार्टी आफॅ इंडिया, एपीआय). 

अनामत रक्‍कम भरण्यासाठी "चिल्लर' 
भरत जैन या उमेदवाराने 25 हजार रुपयांची अनामत रक्‍कम चिल्लरच्या स्वरूपात भरली. त्यात एक, दोन आणि पाच रुपयांची नाणी होती. ही रक्‍कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना सुमारे दीड तास लागला. 

Web Title: 46 candidates filed nominations Pune Lok Sabha elections