State Bank : स्टेट बँक ऑफ इंडियाची 47 कोटीची रुपयांची फसवणूक

स्टेट बँक ऑफ इंडियाची 47 कोटीची रुपयांची फसवणूक
 State Bank
State Bank

स्टेट बँक ऑफ इंडियाचा ऑटो लोन कॉन्सिलर असलेल्या एका व्यक्तीने बँकेची तब्बल ४७ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील विद्यापीठ रोड शाखा आणि टिळक रोड शाखेत हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी आदित्य नंदकुमार शेठिया याच्यासह दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार २०१७ ते २०१९ दरम्यान घडला आहे.

ते २०१९ या काळात मंजूर करण्यात आलेली ४६ वाहन कर्ज प्रकरणे संशयित असल्याचे ऑडिटमध्ये समोर झाले होते. हे वाहन कर्ज करून देणारे बँकेचे ॲटो लोन कौन्सिलर आदित्यने त्याच्या इतर साथीदारांमिळून बँकेची फसवणूक केली. बनावट कोटेशन टॅक्स इन्व्हाईस मार्जिन आणि फुल पेमेंटच्या रिसीट प्रत बनवून ते खरे असल्याचे भासवले.

त्याने बँकेतून महागड्या गाड्यांसाठी मोठ्या रकमेचे वाहन कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील काही प्रकरणात सुरुवातीला इतर खात्यावर रक्कम वळती केली नंतर संबंधित वाहन कर्जदार यांच्या नावावर ही रक्कम वर्ग करत बँकेची ४७ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक केली. या शिवाय त्याने आणखी कुठल्या बँकेला गंडा घातला आहे का याची चौकशी सध्या सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com