मावळात विकासकामांसाठी पाच कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात मूलभूत सुविधांच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली. 

२०१८-१९ या आर्थिक वर्षात तालुक्‍यातील विविध गावांतील मूलभूत विकासकामांचे प्रस्ताव सरकारच्या ग्रामपंचायत व पंचायत राज विभागाकडे पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांना संबंधित विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. स्मशानभूमी निवारा शेड, बसथांबे, रस्ते आदी कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

त्यात दुधिवरे, कुसगाव बुद्रुक, माळवाडी, वडेश्‍वर, शिवली, निगडे, खडकाळा, पुसाणे, कोथुर्णे, खांडशी, करुंज, आढे, करंजगाव, बऊर, कुसगाव पमा, मोरवे, शिळींब, थोराण, पाटण, वारंगवाडी, जांबवडे, आंबळे, दिवड, आढले खुर्द, मळवंडी ढोरे, थुगाव, परंदवडी, महागाव, करुंज (राऊतवाडी), चिखलसे या गावांमध्ये स्मशानभूमी निवारा शेड बांधण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये, वळवंती, कुसगाव पमा, कांब्रे नाणे मावळ, कांब्रे आंदर मावळ, डोंगरगाव ते कचरेवाडी जोड रस्ता, आढले बुद्रुक या गावांतील रस्त्यासाठी प्रत्येकी पंधरा लाख रुपये, तर ताजे, मळवंडी ठुले, शिवली ते नामदेववाडी, कशाळ या गावांमधील रस्त्यांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये तसेच परंदवडी, शिलाटणे, देहूरोड (कृष्णानगर), देहूरोड (बॅंक ऑफ महाराष्ट्रसमोर), कडधे, देहूफाटा व शिवणे येथे बसथांबा बांधण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती भेगडे यांनी दिली.

Web Title: 5 Crore Development work in maval Bala Bhegade