पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (व्हिडिओ)

uruli
uruli

लोणी काळभोर (पुणे) : हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यात चार कामगार राजस्थानी असुन एक जण लातुर जिल्हातील रहिवाशी आहे. दुकान मालकाने चोरट्यांच्या भितीने दुकानाच्या शटरला बाहेरुन कुलूप लावण्याने, आग लागल्याची चाहुल होऊनही, दुकानाच्या बाहेर न पडता आल्याने पाचही कामगाराचा होरपळुन मृत्यु झाला. या आगीत कापड दुकानाची सुमारे तीन कोटी रुपयांची आर्थिक हाणी झाल्याचा अंदाज आहे. 

राजयोग होलसेल साडी या कापड दुकानाच्या गोदामाला लागलेल्या आगीत राकेश सुखदेवजी रियाड (वय-22 रा. ग्राम दासास तालुका रियाबडी, जिल्हा नागोर, राजस्थान) धिरज ओमप्रकाश चांडक (वय- 25 रा. गाधवड जि. लातुर) राकेश बुगारम मेघवाल (वय -20) व धर्मराज तुकाराम बडियासर (वय- 25 रा. दोघेही ग्राममेवडा, ता. देगाना, जि. नागोर, राजस्थान) सूरज परूजी शर्मा (वय-२५ रा. भडायली ता. रियाबडि जि. नागोर, राजस्थान) या पाच जनांचा मृत्यू झाला आहे. दुकानमालक राजीव रामदास भाडळे (वय- 35, रा. उरुळी देवाची ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची हद्दीत निखील बबन भाडळे यांच्या मालकीचे गोदाम असुन, निखील भाडळे यांनी हे दुकान सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीमल प्रजापती (रा. सुरत, गुजरात) या दोघाना चालविण्यास दिले होते. दुकान सुमारे सात हजार स्क्वेअर फुटाचे आहे. दुकानामध्ये  साडी  आणि रेडीमेड कपड्याचे दालन होते. या दुकानाच्याच गोदामामध्ये सगळे कामगार राहात होते. बुधवारी (ता. 8) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास दुकानाचे व्यवस्थापक सुरेश रामाराम जाखड हे नेहमीप्रमाने दुकानाच्या शटरला बाहेरुन कुलुप लाऊऩ, घरी झोपण्यासाठी गेले. यावेळी दुकानात पाचही कामगार गोडाऊनमध्ये झोपले होते. गुरुवारी पहाटे सव्वा चार वाजनेच्या सुमारास सुरेश जाखड यांचा मावस भाऊ राकेश रियाड याला जाग आली असता, संपुर्ण दुकानात आग लागल्याचे आढळुन आले. यावर राकेश रियाड याने क्षणाचाही विलंब न करता सुरेश जाखड यांना मोबाईल फोन करुन दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. तसेच दुकानाच्या ळटरला बाहेरुन कुलुप असल्याने, पाचही जनांना दुकानाच्या बाहेर पडता येत नसल्याचे रियाड याने जाखड यांना सांगितले.

सुरेश जाखड यांनी घटनेची माहिती दुकान मालक निखील भाडळे यांना कळवली. यादरम्यान दुकानाला लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने, शेजारचे लोकही दुकानाभोवती जमा झाले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप  काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली. यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. आत अडकलेल्या पाचही कामगारांनी स्वतःला वाचविण्यासाठी बाहेर पडण्याच्या उद्देशाने दुकानाच्या हाती लागतील त्या खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. दुकानात कपड्यांनी पेट घेतल्याने, पाचही जण होरपळुन मृत्युमुखी पडले.

दरम्यान घटनेची माहीती लोणी काळभोर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी आगीची माहिती अग्निशामक दलाला देताच, पंधऱा मिनीटाच्या आत अग्निशामक दलाच्या तातडीने 5 गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे तास भराच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. मात्र याच पाच जनांना आपला जीव मात्र गमवावा लागला. 

वरील पाच कामगारांच्या मृत्युस दुकान मालकाचा निष्काळजीपणा कारणीभुत ठरलल्याचे चौकषीत निस्पन्न झाल्या, दुकानमालक व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर खुनाचा गुन्हा गाखळ करण्यास मागेपुढे पहाणार नाही अशा इशारा बंडगर यांनी यावेळी दिला. - पोलिस निरीक्षक सुरज बंडगर


दुकानात आग प्रतिबंधक यंत्रणाचा अभाव
हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची व वडकी गावच्या हद्दीत राजयोग साडी डेपो सारखी शंभरहुन अधिक कापड दुकाने आहेत. उरुळी देवाची, फुरसुंगी व वडकी परीसरातील स्थानिक युवकांनी सुरतसह गुजरात राज्यातील कापड व्यावसायिकांना हाताशी धरुन, व संबधितांना भागीदारीत घेऊन कापड दुकाने थाटली आहेत. मात्र या परीसरातील एकाही दुकानात आग प्रतिबंधक यंत्रणा अथवा उपाय योजना केलेल्या नाहीत. राजयोग साडी डेपोला लागलेल्या आगीवरुन वरील बाब पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com