पुणे : सारसबागेत झाड कोसळल्याने एकाच कुटुंबातील 5 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

या घटनेत निकिता नितीन बत्तेल्लू (वय 24) मानसी पेंटा (15) नेहा बत्तेलू, प्रसाद बत्तूेल्लू, (21) ओम गणेश दुभाष (11रा. सर्व लष्कर परिसर) महेश पेंटा, त्त38, रा. अहमदनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

पुणे : सारसबागेतील जुने झाड कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. या घटनेत एक युवती गंभीर जखमी झाली असून, दहा वर्षाच्या मुलगा किरकोळ जखमी आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

दरम्यान, या घटनेची माहिती महापालिका प्रशासनाकडे नव्हती. येथील सुरक्षारक्षकांनाही वेळेत घटनेचे गांभीर्य कळू शकले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळू शकली नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

या घटनेत निकिता नितीन बत्तेल्लू (वय 24) मानसी पेंटा (15) नेहा बत्तेलू, प्रसाद बत्तूेल्लू, (21) ओम गणेश दुभाष (11रा. सर्व लष्कर परिसर) महेश पेंटा, त्त38, रा. अहमदनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

बत्तेल्लू कुटुंबिय बुधवारी दुपारी सारसबागेत आले होते. तेव्हा, तेथील सिध्दीविनायक मंदिराच्या शेजारील हिरवळीवर ओम आणि मानसी खेळत होते. तर अन्य सदस्य बसले. त्यावेळी शेजारचे गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. त्यात,पाचही जण जखमी झाले. निकिताच्या डोक्‍याला मार लागला असून, त्यानंतर जखमींना तातडीने उपचारसाठी रुग्णालयांत हलविण्यात आले. निकिताची प्रकृती गंभीर असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

Web Title: 5 people injured on tree collapsed in Pune